आज सकाळिच दॆनिक सकाळ-नगर Today मध्ये श्री विजयसिंहजी होलम यांचे article"रुग्णवाहिकांतून होतेय रुग्णांची पळवापळवी "
वाचले त्यावरुन सुचले ते आपल्यापुढे मांडतो......
पुरातन काळातहि वॆद्य (Doctor) होतेच आपण म्हणतो जुने ते सोने . पण कधी कधी हि म्हणहि खरीच असेल असेहि नाहि कारण मानवाच्या ठिकाणी तीन गुण आहेत १/- सत्व गुण २/- रजोगुण ३/- तमो गुण . तुका म्हणे जग । केले गुणाचे तीन ॥ या तीन गुणांनीच हे संपूर्ण जग बांधले आहे. मग तो doctor असो नाहि तर आणखी कोणीहि असो धनाचा लोभ त्याला पापाकडे प्रव्रुत्त करीत असतो.म्हणुन पापाचा बाप लोभ आहे असे म्हणले जाते. खरे तर "मा कस्यस्विद धनम " असे उपनिषद सुध्दा म्हणते किंवा "वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करि ॥ असे जगदगुरु श्री तुकाराम महराजहि म्हणतात कारण त्यांना असे वाटते की लोक आपला उपदेश ऎकतील .पण मोठि अवघड गोष्ट आहे क्वचीतच ऎकतात पण हि संख्या बोटावर मोजण्याएवढिच म्हणावी लागेल. रुग्ण जेव्हा या doctorच्या समोर जेव्हा टेबलवर झोपतो तेव्हाच त्याने आपला जीव त्यांच्या हातात दिलेला असतो विश्वास नांवाची गोष्ट फ़ार महत्वाची आहे .कुराण शरिफ़मध्ये सुध्दा "बेईमानीला " सगळ्यात मोठे पाप समजले आहे. doctor लोकांचे जर असे भयानक networking असेल तर विश्वास कोणावर ठेवावा ? काहि चांगले जरुर आहेत पण ! ते गीतेत म्हट्ल्याप्रमाणे...मनुष्याणां सहस्त्रेषु.... हजोरो मनुष्यामधुन एखादाच ख-या अर्थाने चांगला असतो.(क्लोरोफ़ार्म-नांवाचे पुस्तक जरुर वचावे) तेव्हा पुरातन काळी एका सुभाषितकाराल आलेला अनुभव त्याने एका सुभाषितातून मांडला आहे....तो म्हणतो..
वॆद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर ।
यमस्तु हरति प्राणान वॆद्य: प्राणान्धनानि च ॥
अर्थ :- वॆद्यराज ! आपणाला नमस्कार असो . आपण यमाचे सख्खे बंधु आहात. यम प्राण हरण करतो पण वॆद्यराज ! आपण प्राणासह धनाचे हरण करता.( यमराजापेक्षा काकणभर जास्तच म्हणावे का ?)
जगदगुअरु श्री तुकाराम महारज म्हणतात " वॆद्य वांचविती जीवा । तरी कोण ध्याते देवा ।" थोडक्यात या वॆद्यराजांना ईश्वरक्रुपेने एक चांगली संधी मिळाली आहे ती म्हणजे रुग्णाला जीवन दान देण्याचे फ़ुकटचे श्रेय आणि उदर्निर्वाहाकरिता धन सुध्दा....पण जेव्हा लोभ वाढतो तेव्हा पापाची भिती वाटत नाही.